Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - मामाच्या शेतात कापूस वेचणार्‍या श्रीगोंद्यातील चिमुरड्याचा बिबट्याकडून फडशा ;आष्टीत नरभक्षक बिबटे

No comments

   News24सह्याद्री -




अहमदनगर जिल्ह्यापाठोपाठ बिबट्याने बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे , बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दोन दिवसांपूर्वीच बिबट्याने एकाचा जीव घेल्यानंतर आता पुन्हा एका  आठ वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेट ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वराज भापकर असं या चिमुरड्याच नाव आहे .स्वराजला बिबट्याने  उचलून नेल्यानंतर अवघ्या काही तासातच  याचा मृतदेह एका शेतात सापडला. तेव्हा मृत अवस्थेत पडलेल्या  स्वराजच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या आहेत ,किन्ही परिसरात हि घटना घडलीच समजतंय . स्वराज हा श्रीगोंद्यातीळ राहणारा आहे , मात्र मामाकडे किन्हीला आला होता , मामाच्या शेतात कापूस वेचत असताना हि दुर्दैवी घना घडली , दरम्यान आष्टी तालुक्यातील जवळपास २२ गावांमध्ये बिबट्याने नागरिकांना दर्शन दिल्याची माही गावकरी सांगताहेत , त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातवरण पसरली . तर राज्य सरपंच परिषद अध्यक्ष दता काकडे  यांनी या चिमुरड्याच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे , यासह तालुक्यात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणीही काकडे यांनी केली आहे , तर वनविभागही त्यांच्या परीने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयन्त करताना दिसताहेत मात्र बिबट्याचा वावर मानवीवस्तीत वाढल्याने  सर्वानी सतर्क राहा , व आपल्या परिसरात बिबट्या आढळल्यास वन विभागास नक्की कळवा   


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *