Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - नगर जिल्ह्यातील ४० % गावे कोरोना बाधित , देशाच्या तुलनेत नगरमध्ये दगावतात रोज दीड टक्के रुग्ण

No comments

 News24सह्याद्री  -  नगर जिल्ह्यातील  ४० %  गावे  कोरोना बाधित , देशाच्या तुलनेत  नगरमध्ये  दगावतात रोज दीड टक्के रुग्ण....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये मार्च महिन्यात पहिल्यांदा एक कोरोनाबाधित नगर जिल्ह्यात आढळला होता आणि त्यानंतर हळूहळू एक दोन एक दोन करत कोरोना बाधितांच्या संख्येने हजारांचा टप्पा ओलांडला, नंतर दहा हजारांचा आणि मागच्या दोन महिन्यात तर कोरोना एवढा झपाट्याने वाढलाय की आज कोरोना बाधितांच्या संख्येने पंचवीस हजारांचा टप्पा ओलांडलाय. नगर जिल्ह्यातले जपलपास 30  ते 40% गावं पुर्णपणे कोरोना बाधित आहे.. रोज पाचशे पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना बाधित असल्याचं अहवालातुन स्पष्ट होतयं..  एवढं असुनही कोरोना चाचणी न करता अंगावर दुखणं काढणा-यांची संख्या तर विचारु नका. याशिवाय  कोरोना टेस्टिंग किटचा तुटवडा जाणवतोय म्हणुन कित्येकांची कोरोना चाचणी न करताच मागे पाठवुन दिलं जातय, म त्यातला एखादा बाधित असेल तर तो अजुबाजुच्यांनाही कोरोनाचा वानोळा देत फिरतोय, हि सत्य परिस्थिती आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *