Breaking News

1/breakingnews/recent

गोष्ट कायद्याची - वाहन अपघात आणि कायदा ...

No comments

 News24सह्याद्री  - 


 अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे  झाला असेल तर त्या चालकावर भारतीय दंड संहिता कलम २७९ व मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवला जातो. अपघातातील जखमींची अवस्था किरकोळ अथवा गंभीर स्वरूपाची असेल तर चालकावर भारतीय दंड संहिता कलम ३३७ व ३३८ नुसार अतिरिक्त कलमे लागतात. आणि जर अपघातग्रस्त मृत्यूमुखी पडला तर भारतीय दंड संहिता कलम ३०४ अ नुसार गुन्हा नोंदवला जातो. 


मोटार वाहन कायदा, १९८८ कलम १४० मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार अपघातग्रस्ताच्या कायमचे अपंगत्व प्रकरणी २५ हजार व अपघातग्रस्ताच्या मृत्यूप्रकरणी त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंबियांना ५० हजार अशी त्वरित मदत दिली जाते. मात्र, त्यासाठी कलम १४० नुसार अर्ज केला जाणे आवश्यक ठरते.
 साधारणत कलम १४० अंतर्गत अर्जाचा निकाल हा ४५ दिवसांत लागला पाहिजे


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *