सह्याद्री ब्रेकिंग - नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह
News24सह्याद्री -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तनपुरे यांनी ट्विट करून माहिती दिली. राज्यमंत्री तनपुरे यांच्याबरोबरच अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार दळवी यांना रस्त्यातूनच माघारी फिरावे लागले. अधिवेशन सुरू झाल्यानंतर एका मंत्र्यासह आमदाराला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.
No comments
Post a Comment