Breaking News

1/breakingnews/recent

"हे पत्रं पालिका आयुक्तांना विनंती म्हणून नाही तर..." : आशिष शेलार

No comments
भाजप नेते आशिष शेलार यांचे पालिका आयुक्तांना पत्र

News24सह्याद्री - 

मुंबई ।
भाजप नेते आशिष शेलार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त यांना पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी मुंबईत घडणाऱ्या असंवेदनशील घटनांचा संताप व्यक्त केला आहे. हे पत्र पालिका आयुक्तांना विनंती, मागणी आणि पाठपुरावा अथवा सूचना करण्यासाठी लिहीत नसून मनातील संताप,चीड आणि वेदना, दुःख व्यक्त करण्यासाठी लिहलंय असं म्हणत त्यांनी हे पत्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.



काय आहे पत्रात
हे पत्र पालिका आयुक्तांना विनंती, मागणी आणि पाठपुरावा अथवा सूचना करण्यासाठी लिहीत नसून मनातील संताप,चीड आणि वेदना, दुःख व्यक्त करण्यासाठी लिहतो आहे. मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार केले जात असल्याची बाब उघड झाली होती. त्यानंतर सतत काही असंवेदशील घटना घडत असून उयाकडे लक्ष द्यावे असे आम्ही पालिकेला वारंवार सांगत आलो आहोत. तसेच या घटनांबाबत न्यायालयात याचिका दाखल करून सामान्य माणसांच्या लढाईला आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यावर न्यायालायने पालिकेची आणि सरकरची कां उघाडणी केली तरी हि शृंखला थांबत नाही.

शताब्दी रुग्णालयात कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या आपल्या आईचा मृतदेह २१ वर्षीय मुलाला पीपीई किट न देता गुंडाळायला लावले. स्ट्रेचर उचलण्यासाठी रुग्णालयाने कर्मचारी दिले नाही. त्यामुळे कोणतीही काळजी न करता त्या मुलाच्या मित्राने आणि मुलाने आईचा मृतदेह उचलला, ही घटना काय सांगते आहे?
दिवसागणिक मुंबई महापालिकेची यंत्रणा अमानवी असंवेदनशीलतेचा कळस गाठत आहे. वारंवार घडणाऱ्या घटना ह्या शहरातील संवेदनशील माणसाच्या मनाला वेदना देणाऱ्या संताप, चीड आणणाऱ्या आहेत.

 सरकारने आणि मुंबईच्या पालकमंत्र्यांनी मुबईकडे फिरवलेली पाठ महापालिका आयुक्त म्हणून आपण मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा अथवा अन्य कोणती सभा व्हावी, नगरसेवकांच्या सूचना ऐकाव्या, त्यांचे म्हणणे ऐकावे, चर्चा व्हावी याबाबतही पुढाकार घेत नाहीत त्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम करीत आहात कि "प्रशासक"? असा सवालही जनतेकडून विचारला जात आहे. मुंबईत नाईट लाईफ चालू करून मुंबईचा चेहरा बदलू पाहणारे आता या असंवेदनशील चेहऱ्यमागे का लपून बसले आहेत, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतो. या सततच्या घटना त्यात मानवी मनावर होणारे आघात. या शहरात वेदनेचा दाह निर्माण करणारे आहेत. या अमानवी असंवेदनशील घटनांपासून मुंबईकरांची सुटका होवो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद"

या लिहलेल्या पत्राद्वारे भाजपनेते आशिष शेलार यांनी असंवेदनशील घटनेवर संताप व्यक्त करत सरकारवर टीकाही केली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *