Breaking News

1/breakingnews/recent

मुंबई,पुण्याला दिलासा नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

No comments
मुख्यमंत्र्यांनी साधला फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद
NEWS24सह्याद्री - 
मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. यामध्ये मुंबई, पुणे जे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणची वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता मुंबई , पुणे व इतर हॉटस्पॉट क्षेत्र आहे त्या ठिकाणी लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.

ग्रीन झोन मध्ये जर कोरोनाबाधित रुग्ण गेला तर तिथे धोका संभवू शकतो त्यामुळे जे हॉटस्पॉट क्षेत्रात काही न करणच योग्य राहील.ऑरेंज झोन जिथे रुग्ण वाढले नाहीत पण रुग्ण आहेत तो परिसर सोडून इतर ठिकाणी काय सुरु करू शकतो याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रीन झोन मधले लॉकडाऊन हे आधीच शिथिल करण्यात आले आहेत. तसेच ज्यांना परराज्यात जायचं आहे त्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे त्याची सोय आम्ही करत आहोत परंतु लगेच झुंबड करू नका अन्यथा तीही परवानगी आम्ही काढून घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *