Breaking News

1/breakingnews/recent

होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले

No comments


डीवायएसपी संदीप मिटके यांची कारवाई  । तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 
अहमदनगर । News 24 सह्याद्री -
 संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. जे  संशयिता आहेत त्यांची तपासणी केली जात आहे व त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारला जात आहे. त्यांना घरीच थांबण्याचे आदेश आहेत. नगर शहरामध्ये  अशाच एका व्यक्तीला डीवायएसपींच्या पथकाने सर्जेपुरा येथे पकडले असून त्या व्यक्तीला सिव्हीलच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारलेला व्यक्ती नगरमध्ये फिरत असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी मिटके यांच्यासह पथकाने तातडीने सर्जेपुरा परिसरात धाव घेतली. तेथे हातावर होम क्वॉरंटाईचा शिक्का असलेला एक व्यक्ती आढळून आला. या घटनेची माहिती पोलिस प्रशासनाने तातडीने सिव्हीलमधील अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर सदर होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तीला शासकीय अ‍ॅम्ब्युलन्सधून आयसुलेशन वॉर्डमध्ये नेण्यात आले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात होम क्वॉरंटाईनचे उल्लंघन केल्याबद्दल भादवी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तोफखाना पोलिस ठाण्यात सुरु असल्याची माहिती डीवायएसपी मिटके यांनी माध्यमांना दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *