Breaking News

1/breakingnews/recent

नगर शहरात महापालिका करणार 'त्या' अडीच घरांची तपासणी

No comments


महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची माहिती
अहमदनगर । News 24 सह्याद्री -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले . अहमदनगरमध्ये आत्तापर्यंत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या भागातील हे रुग्ण आहेत त्या भागातील सुमारे २५०० हजार घरांची महापालिकेचे वैद्यकीय पथक तपासणी करणार आहेत . दोन दिवसांपासून तपासणीस सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 500 घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एकही कोरोना संशयित सापडलेला नाही असे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिकेकडून काही परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून नगरमध्ये निर्जंतुकीकरण केले जात आहे.

तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रविवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र त्यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. किराणा दुकानदारांचा स्टॉक माल संपल्यामुळे . या किराणा दुकानदारांना होलसेलमध्ये किराणा आणण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस मागणी नुसार होलसेल दुकानदारांकडून किराणा आणता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचीही गैरसोय टळणार आहे.

संपूर्ण देश लॉकडाउन झाल्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा पडू नये म्हणून लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत . भाजीपाल्याचा भाजी बाजार सुरु ठेवल्यास नागरिक अजून मोठ्या प्रमाणात भाजीबाजारात गर्दी करतील. त्याअनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील भाजीबाजार ३१  मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून भाजी विक्रेत्यांना घरोघरी जावून भाजी विकण्यास परवानगी देण्यात असल्याची माहिती मायकलवार यांनी दिली.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *