विराट कोहली आपल्या संघाला विजयाच्या वाटेवर नेण्यास पूर्णपणे सक्षम आहे - केविन पीटरसन
मुंबई -
केविन पीटरसन म्हणाला की इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनच्या मते विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदाबद्दल होणाऱ्या चर्चेला अर्थ नाही. ही चर्चा अनावश्यक आहे. पण कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चार कसोटी सामने गमावले आहे आणि त्यावेळी अजिंक्य रहाणे संघात होता, त्यामुळे ही चर्चा होतच राहणार आहे. भारतात कसोटी कर्णधारपदावरुन होणारी चर्चा टाळणे अशक्य आहे. कर्णधार म्हणून विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग चार सामने हरला आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियातील भारताच्या मालिका विजयाचे नेतृत्व केले आहे. असे पीटरसनने ‘बेटवे’साठी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. पितृत्वासाठी घेतलेली रजा संपवून विराट कोहली पुन्हा एकदा नियमित कर्णधार म्हणून परतला आहे.
पण इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातच भारताला पराभव पत्करावा लागला आहे. सोशल मीडिया, प्रत्येक रेडिओ स्टेशन आणि प्रत्येक वृत्त वाहिनीवर काय घडले? याची सखोल चर्चा सुरु आहे. देशाचे कर्णधारपद भूषवणे हे कठिण असते. विराटला विचलित करणारी किंवा कर्णधारपदावरुन पुन्हा एकदा गोंधळाची स्थिती नकोय. विराट कोहली आपल्या संघाला विजयाच्या वाटेवर नेण्यास पूर्णपणे सक्षम आहे असे पीटरसनने त्याच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या कसोटी सामन्यात नव्हता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करण्याचा त्याच्यावर दबाव असेल. आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. शनिवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ब्रॉड टीममध्ये असेल असे पीटरसनने ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

No comments
Post a Comment