ग्राऊंड रिपोर्ट - आता होणार गाव तिथे नाटक !
News24सह्याद्री -
कला हि कलाकाराचा आत्मा असते, मात्र २०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या संकटाने कलाकाराला सुद्धा आपल्या कलाक्षेत्रापासून वंचित केलंय. कोरोनाच्या काळामध्ये तर अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती, सरकारने आता लोकडाऊनला शिथिलता दिल्यानंतर अनेक व्यवसाय हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मात्र चित्रपट गृहे आणि नाट्यगृहे अजूनही बंदच आहेत, त्यामुळे कलाकाराचे होणार काय हा प्रश्न उपस्थित झालाय. हीच बाब लक्षात घेत गावागावात नाटक हि कला पोहोचवण्यासाठी नगरमधील काही तरुण कलाकारांनी लोकडाऊन नंतर पहिल्यांदाच गाव तिथं नाटक हि संकल्पना सादर करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय.
No comments
Post a Comment