Breaking News

1/breakingnews/recent

७ फेब्रुवारी-उदयनराजें vs शिवेंद्रराजें

No comments

NEWS24सह्याद्री

 सातारा येथील पंडीत ऑटोमोटिव्हच्या कंपनीच्या कामगारांच्या आंदोलनाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही आता या गोष्टीला  प्रत्युत्तर दिले आहे.काहीदिवसांपूर्वी  साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह प्रा. लि. कंपनीच्या कामगारांनी सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कंपनीची जागा खरेदी केल्याने कामगार आक्रमक झाले होते. कामगारांना पगार मिळालेला नसून त्यांना कंपनीतच येऊन दिले जात नाही असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली.

     त्यानंतर कामगारांनी आत्मदहन करण्याऐवजी हे सर्व घडवून आणून अन्याय करणाऱ्यांचे दहन करावे, असा सल्ला उदयनराजे भोसले यांनी दिला.तर  राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला होता. “मी ठामपणे आवाज उठवला तर माझ्यावर खंडणीच्या केसेस टाकल्या. भूमिपूत्रांना पहिले काम दिले पाहिजे, अशी भूमिकाही मी मांडली तर माझ्यावर दोन लाखांची खंडणीची केस त्या मालकाला टाकायला लावली. मग या कामगारांचे काय होणार? पण, मी त्यांच्या चिंध्या होऊ देणार नाही. दोन लाखांची खंडणी घ्यायला मी काय चिंधी चोर आहे का, लोकांची प्रगती झाली पाहिजे. एमआयडीसीला लागलेली ही किड असून यांच्या खोलात मी जाणार आहे,” असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते.

त्यानंतर प्रतिउत्तर म्हणून आता शिवेंद्रराजेंनी या आरोपांना उत्तर दिले आहे. हत्ती आणून चिरडून टाकेन असे म्हटल्यानंतर आमदार शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना सल्ला दिला. ते म्हणालेत “कशाला? तुम्ही हात्ती आणणार, वन विभागाची परवनागी घेणार. त्यापेक्षा उदयनराजेंनी नुसती माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडला जाईन. मी त्यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर राहातो,” आशा खोचक शब्दात त्यांनी टोला लगावला आहे...,,,, 

“कारखानदारांकडून हप्ते घेणं त्यांना दमटाटी करणं, यामुळे सुद्धा साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत. तसेच असलेल्या कंपन्याही निघून गेल्या. लिलाव सहा वेळा काढला तेंव्हा का यांनी आवाज उठवला नाही. तु्म्ही त्यावेळी का हरकत घेतली नाही. धमक्या देणे हे सातारकरांना सवय झाली आहे. खासदारांनी तेथे येऊन काही केले तर ट्रेसपासचा गुन्हा दाखल करणार आहे. तुम्हाला जायचे तर हायकोर्टात जा, ते निर्णय देतील. आम्ही काय पाकिस्तानमधून आलो नाही. व्यवसाय आहे. सगळेच व्यवसाय करतात. आम्ही कारखानदारांनाच ही जागा दिली. हा निर्णय सातारच्या दृष्टीने चांगलाच आहे,” असेही शिवेंद्रराजे यांनी म्हटले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *