Breaking News

1/breakingnews/recent

७ फेब्रुवारी-सख्या मुलानेच केला बापाचा निर्घृण खून

No comments

NEWS24सह्याद्री

राग हा माणसाचा शत्रु आहे म्हणतात ते खरय याचाच प्रत्यय औरंगाबादमधील वाळूज पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या गंगापुर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे मुलानेच बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.आईच्या आत्महत्येची सल मनात बाळगून तरुणाने जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची घटना दहेगाव बंगला येथे घडलीय.

दहा वर्षापूर्वी कडुबाळ सोनवणे यांच्या पत्नीने घरगुती वादातून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून कडुबाळ सोनवणे आपल्या दोन मुलांसह राहत होते. अनिल (२२) आणि सुनील (२८) यांच्यासोबत राहणारे कडुबाळ आपला प्रपंच हाकत होते. मात्र मुलगा अनिल आईच्या आत्महत्येची सल मनात ठेवून वडिलांसोबत नेहमीच वाद घालायचा. शनिवारी जेवण्यास नीट दिले नाही या कारणावरून वडिलांसोबत अनिलचा वाद झाला. वडील घराबाहेर झोपले असता अनिल रागारागात त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागला. तो बराच वेळ आपल्या वडीलांना लाथाबुक्क्यांनी मारत होता. तर  ह्या जब्बर मरहाणित तर  पित्याचा जागीच जिव गेला,

  तर सदर घटनेची माहिती रविवारी पहाटे स्थानिक पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अनिलला ताब्यात घेतलं.पोलीस उपायुक्त उज्वला बनकर यांच्या नेतृत्वाखाली वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले,सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंभरे आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

तर आता मोठा भाऊ सुनील सोनवणेच्या फिर्यादीनुसार आरोपी अनिलविरोधात वाळूज पोलीस स्थानकामध्ये कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय।

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *