Breaking News

1/breakingnews/recent

११फेब्रुवारी-रामदास आठवलेंकडून शशी थरुर यांना इंग्रजीचे धडे

No comments

                                            

NEWS24सह्याद्रि 

काँग्रेस नेते खासदार शशी थरुर  आणि आरपीआयचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांच्यात इंग्रजीवरुन ट्विटवर वॉर रंगलं. शशी थरुर यांनी रामदास आठवले यांना उद्देशून एक ट्विट केलं होतं. रामदास आठवलेंनी शशी थरुर यांच्या ट्विटमधील इंग्रजी शब्दातील स्पेलिंगमधील चुका शोधल्या आणि थरुर यांचं ट्विट रीट्विट करत खास अंदाजात उत्तर दिलं. यानंतर शशी थरुर यांनी ट्विट करत रामदास आठवलेंना उत्तर दिलं. थरुर यांनी ट्विट करताना थेट जेएनयूच्या  नव्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलिपुडी पंडीत यांच्यावर निशाणा साधला.

थरुर यांच्या टीकेला रामदास आठवले यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. डिअर शशी थरुरजी, विनाकारण वक्तव्य करताना चुका होता. Bydet नसतं तर Budget असतं आणि rely नसून replay असतं आम्ही समजू शकतो, असं रामदास आठवले म्हणाले. खरंतर शशी थरुर हे नव्या आणि मोठ्या इंग्रजी शब्दांचा वापर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का देतात. मात्र,आठवले यांनी ट्विटवर त्यांना इंग्रजीचे धडे दिले.

शशी थरुर यांनी एक ट्विट केलं होतं.त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा फोटा होता. त्यात रामदास आठवले मागे बसलेले दिसून येतात. थरुर म्हणाले की,बजेटवरील चर्चा दोन तास चालली.रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्व काही सांगत आहेत.याशिवाय पहिल्या रांगेत बसलेल्या लोकांना देखील अर्थमंत्री करत असलेल्या दाव्यावर विश्वास होत नाही,असं थरुर यांनी म्हटलं होतं.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *