शहराची खबरबात- कर्डिलेंनी चोखाळला मिठाई मार्ग !
News24सह्याद्री - ५० हजार शिक्षकांवर व कर्मचाऱ्यांवर अन्याय ..! पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
भिंगार छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे वसंत राठोड
केंद्र सरकारने भिंगार छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे वसंत राठोड यांची नियुक्ती केली आहे. छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर विजय राणा यांनी वसंत राठोड यांना उपाध्यक्षपदाची शपथ देवून वसंत राठोड यांचा सत्कार केला. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आवारात झालेल्या सत्कार समारंभात भैय्या गंधे . कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, श्रीमती सरोज गांधी, महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना मुंगी, संतोष गांधी, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, वैशाली कटोरे, चांदमल राठोड, तुषार पोटे, ज्ञानेश्वर काळे, किशोर कटोरे, लक्ष्मिकांत तिवारी, ब्रिजेश लाड आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते.
==============
No comments
Post a Comment