Special report - या महिलांनी केलं असं काम की ते पाहून तुम्ही ही हैराण व्हाल
News24सह्याद्री - या महिलांनी केलं असं काम की ते पाहून तुम्ही ही हैराण व्हाल.....पहा सह्याद्री special रिपोर्ट
बाईचं जीवन चूल आणि मूल या पलीकडे काहीच नाही असच काहीसा प्रवास महिलांच्या जीवनाचा होता मात्र आता महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही हे महिलांनी दाखवून दिले आहे अंतराळा पासून ते थेट रिक्षा चालका पर्यंत महिला काम करताना दिसून येत आहेत रिक्षा चालक बस चालक मालट्रक चालक आशा विविध क्षेत्रात महिलांनी जाणे म्हणजे एक चॅलेंज स्वीकारणं आहे. मात्र हे चॅलेंज महिलांनी स्वीकारलं आणि आज त्या महिला पुरुषांची मक्तेदारी मोडत आपले राज्य गाजवत आहेत. चला तर आज आपण पाहणार आहोंत अशाच काहीश्या वेगळ्या महिला. या आहेत पंजाब राज्यातील जसबीर कौर या सिमला येथे एका पाण्याच्या टँकरवर ड्रायव्हर म्हणून काम करतात सिमला मध्ये पाणी टंचाईच्य काळात गावो गावी जाऊन लोकांची तहान भगवायचं काम जसवीर कौर करत असतात ...सिमला म्हणजे सर्व पहाडी भाग या भागात गाडी चालवणे म्हणजे एक चॅलेंज असते मात्र जसबीर कौर हे चॅलेंज लीलया झेलतात आणि या पहाडी भागात ड्रायव्हिंग करत असतात.
ठाण्यातील महिला रिक्षा चालक स्मिता रामाणे यांच्या जिद्द आणि चिकाटीची अशीच कहाणी आहे ठाण्यात त्या रिक्षा चालक म्हणून काम करतात पुरुषांची मक्तेदारी मोडत त्यांचा प्रवास सुरु आहे रिक्षा चालक म्हणजे हजरो लोकांच्या संपर्कात रोज येणारच मात्र कोणतीही भीती न बाळगता जास्त शिक्षण नसल्याने अनेक वेळा काम मिळत नसल्याने अखेर त्यांनी रिक्षा चालवण्याचे ठरवले आणि आज त्या यशस्वी गृहिणी आणि रिक्षा चालक म्हणू ठाण्यात रिक्षा चालवत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे नेत आहेत. लोणावळा म्हणजे निसर्गाचं महेरघर नावाजलेल्या पर्यटन स्थळा पैकी एक . मात्र याच ठिकाणी एक युवती रिक्षा चालवून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे अविशा जाधव असं या तरूणीचे नाव असून महिलांमध्ये सध्या अविषाचे नाव आवर्जून घेतले जाते कारण रात्री अपरात्री परगावाहून आलेल्या महिला आवेशालाच फोन करून बोलवून घेतात आणि घरचा प्रवास करतात
हिमाचल येथे एक वीस वर्षीय तरुणी सध्या स्कूल बस चालवत आहे भविष्यात तिला मोठं मोठ्या गाड्या चालवायचं स्वप्नां घेऊन ती हिमाचल मध्ये अली आहे मूळची काश्मीरची उच्चशिक्षित नेन्सी हिने आपलं करियर घडवण्य्साठी ड्रायव्हिंग क्षेत्र निवडलं आहे आज ती बस चालवतेय पण ती जेव्हा बस चालवते तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात आपल्या कुटुंबाबाची मान उंचवण्याचे काम ती करत असल्याचे तीन सांगितलंय कलकत्ता मधील एका महिलेचा असाच एक व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालतोय कारण हि महिला एका गृहिणीच्या वेशात संपूर्ण ऍटोमॅटिक व्हाल्वो बस चालवत आहे.
No comments
Post a Comment