Special report - ट्रम्प तात्या विकताहेत पाकिस्तानमध्ये गायन करून कुल्फी
News24सह्याद्री - ट्रम्प तात्या विकताहेत पाकिस्तानमध्ये गायन करून कुल्फी....पहा सह्याद्री special रिपोर्ट
या जगात काय होईल हे सांगता येत नाहीत, एकेकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प हे आज पाकिस्तानच्या रस्त्यावर कुल्फी विकताना आपल्याला दिसून येत आहे. काय अशी परिस्थिती ओढवली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर.. पाकिस्तानच्या रोडवर चक्क कुल्फी विकण्याची वेळ आलीय, ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असेल ना... पण असा गैरसमज करून घेऊ नका.
सध्या पाकिस्तान मधल्या एका कुल्फी वाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचा आवाजही चांगला आहे. पण त्याच सोबत तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सारखा दिसत असल्याने आणखीनच प्रसिद्ध झाला आहे. या व्यक्तीचे नाव आहे सलीम. सलीमचा चेहरा हा हुबेहूब डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मिळताजुळता आहे. यावेळी वीस वर्षांच्या अली ने सांगितलं की, 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानात आले होते. त्यानंतर आम्ही सलीमला ट्रम्प म्हणून बोलावण्यास सुरवात केलीय. सध्या सलीमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र प्रचंड धुमाकूळ घालत असल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे.
No comments
Post a Comment