16 जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - 'एन सिक्स' संभाजी काँलनी परीसरात नळाला दूषित पाणी. जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने भंडारा जिल्ह्याला 4 व्हेंटिलेटरची मदत
कोरोना काळामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अभावी कोणत्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी सामाजिक बांधिलकी जपत,तिसर्या लाटेच्या पार्श्व-भूमीवर राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जिल्ह्यांना व्हेंटिलेटर पुरविण्याचा निर्णय घेवून,त्यांच्या पुढाकारामुळे भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ४ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले. मंत्री उदय सामंत हे मंगळवारी भंडारा येथे आले असता, सदर व्हेंटिलेटरचे लोकार्पण त्यांच्या हस्ते भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडले. त्यांनतर सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून प्रसार मांध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला व माहीती दिली.
No comments
Post a Comment