Special report - गुडूप झालेली कार बीएमसीकडून बाहेर
News24सह्याद्री - गुडूप झालेली कार बीएमसीकडून बाहेर....पहा सह्याद्री special रिपोर्ट
रोजच्या धावपळीच्या दिनक्रमाध्ये आपल्याला कोणत्याही कामासाठी जाण्या येण्यासाठी महत्वाची ठरते ती म्हणजे आपले वाहन मग ती सायकल असो टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो पण त्यासाठी सगळ्यात जास्त अडचण येते ती पार्किंग ची...ठिकठकाणी पोहोचल्यानंतर गाडी नेमकी पार्क कुठे करायची हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो?
समजा आपली फोर व्हीलर गाडी आपल्याच डोळ्यासमोर पाहता पाहता जर पाण्यात बुडत असेल तर ह्या विचाराने सुद्धा आपला मन थक्क होऊन जात...अशीच एक घटना घडली होती मुंबईतल्या घाटकोपर इथे बघता बघता पार्किंगमध्ये पार्क केलेली कार अचानक पणे पाण्यात बुडायला लागली हा सर्वप्रकार कॅमेरात कैद झालायं.ही घटना घडलीये मुंबईतील घाटकोपर भागातील रामनिवास सोसायटीतील पार्कींगमध्ये .हा विडिओ पाहता पाहता प्रचंड व्हायरल झालाय,
तर आता या घटने बद्दलचा दुसरा विडिओ समोर आलाय यात ती विहिरीत बुडलेली गाडी बाहेर काढण्यात आलीय. क्रेनच्या सहाय्याने ही गाडी काल रात्री पाण्याबाहेर काढली गेली.काल सकाळी पार्क करण्यात आलेली ही गाडी अचानक बुडू लागली होती. हा व्हीडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. पण सोसायटीतल्या विहीरीवर केलेलं आरसीसी बांधकाम खचल्याने ती कार आत बुडली होती. मात्र, विहिरीतून पाणी काढल्यावर गाडी बाहेर काढण्यात आलीये ,,परंतु आता याला जबाबदार नेमक कोण असा प्रश्न आता त्या गाडी मालकाला तसेच येथील सामान्य नागरिकांना पडलाय ??
No comments
Post a Comment