Breaking News

1/breakingnews/recent

Special report - समुद्रात बुडताना त्याने काढला स्वतःचा व्हिडीओ

No comments

   News24सह्याद्री - समुद्रात बुडताना त्याने काढला स्वतःचा व्हिडीओ.....पहा सह्याद्री special रिपोर्ट



बुडत्या जहाजाचा हा व्हिडीओ आपण पाहत आहोत नक्कीच अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ आहे , काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य पाहून नक्कीच अंगावर काटा आला असेल ना,,, खवळलेला समुद्र आणि चहु बाजूनी असणारे पाणी आणि त्यामध्ये बुडणारे जहाज आणि त्यावर एक मनुष्य दिसतो आहे तो या व्हिडिओमध्ये बाय-बाय करताना दिसतोय मात्र या तरुणाच्या चेहऱ्यावर हास्य कायम आहे तो ज्या  जहाजात  बसलेला आहे ते जहाज काही वेळात बुडणार असल्याचं माहित असूनही तो याठिकाणी हसऱ्या चेहऱ्याने बाय-बाय करतानाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे मात्र या बोटीवर असलेल्या या तरुणानं जिंदगी काय चीज आहे हे दाखवून दिले आहे.

या बुडत्या जहाजतही  काही क्षणात त्याला माहित आहे की मी या ठिकाणी नसेल तरीही त्यानी हसत मृत्यूला जवळ केल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येते 22 वर्षे या युवकाचे नाव सुरज चव्हाण असून नुकत्याच येऊन गेलेलया तोकते वदळामध्ये टग बोट वरील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे आणि हा व्हिडिओ पाहून नक्कीच डोळ्यात पाणी येईल आपल्या शेवटच्या क्षणांनानाही कसे आनंदाने घालवायचं असाच संदेश या युवकाने दिला नसेल ना ,मात्र या व्हिडिओ मधील समुद्राचे रौद्र रूप पाहून निश्चितच मनात धडकीच भरणारी आहे ,कारण आपण टायटॅनिक पिक्चर मधील ज्याप्रकारे व्हिडिओ पाहिले होते त्यापेक्षाही भयंकर व्हिडिओ याठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला दिसत आहे या जहाजावर  किती लोक तैनात होते आणि त्यांचं काय झाले असेल हे या व्हिडीओ वरून दिसून येतंय अत्यंत भयानक हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *