२० जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख नाही देऊ शकत...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
१ . सामान्यांना वीकएंड झटका; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं
एकीकडे देशात करोनाचं संकट ठाण मांडून बसलेलं असताना, लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकट देखील ओढवलेलं असताना सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ हे देखील करोना साथीप्रमाणेच पसरलेलं संकट ठरलं आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आता तर पेट्रोलनं काही भागांमध्ये शंभरी देखील गाठली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असा गौरव मिरवणाऱ्या मुंबईचा देखील समावेश आहे
No comments
Post a Comment