Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त ऑनलाईन मेडिटेशन सर्वानी व्हावे सहभागी - डॉ.सुधा कांकरिया

No comments

 News24सह्याद्री -



करोना च्या महामारी मुळे सध्या जगभरचे वातावरण दुषित झाले आहे.  भिती, चिंता, आजारपणाने  संपूर्ण जगाला ग्रासून टाकले आहे. रोज नव्या रूपाने दुःख समोर येत आहे. परिवारातील अनेक सदस्य करोनाशी सामना करतांना थकुन जात आहेत. काही करोना सोबतची लढाई जिंकत आहेत काही हारत आहेत. या लढाई मुळे अनेकांचे मनोबल खचले आहे, दुर्बल झाले आहे.

असे अशक्त कमजोर झालेले मन अनेक शारिरीक व मानसिक आजारांना आमंत्रण देत असते. आजारपणातुन दुःख, भय, आणि या दुःख, भयातुन परत आजारपण असे एक दुष्टचक्र निर्माण झाले आहे. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी आणि परत एकदा संपूर्ण आरोग्य, शांती, प्रेम, एकता  जगात नांदावी यासाठी संघटीत योग मेडिटेशन करण्यात येत आहे. अशी माहिती राजयोगाच्या अभ्यासक डॉ सुधा कांकरिया यांनी दिली 21 जून अर्थातच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी संध्याकाळी ५. ३० ते ६  हजारो व्यक्ती एकाच दिवशी एकाच वेळी आपल्या घरी बसूनच ऑनलाईन मेडिटेशन करतील. या मेडिटेशनमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर सुधा कांकरिया यांनी केला आल आहे.

या संघटीत मास मेडिटेशन रोटरी इंटरनॅशनल विभाग, इनरव्हील इंटरनॅशनल ३१३ विभाग, अ. भा. जैन कॉन्फरन्स तसेच ब्रम्हाकुमारीज राजयोगा हिलर ग्रुप द्वारा आयोजित करण्यात आले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *