20 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - बांधकाम महागले; स्टील, सिमेंट, वाळू तसेच विटांच्या दरामध्ये वाढ.........पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. बांधकाम १५ टक्क्य़ांनी महागले; स्टील, सिमेंट, वाळू, विटांची दरवाढ
करोना संकटकाळातील र्निबध आता शिथिल झाले असले, तरी साहित्याच्या दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्रासमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोबतच आता पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बांधकामांचे दर पूर्वीच्या तुलनेत तब्बल १५ टक्कय़ांनी वाढले आहेत. याचा परिणाम यापूर्वी नोंदणी झालेल्या सदनिकांच्या दरावर झालेला नाही. त्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, उभारणी खर्च वाढल्याने शहरात आगामी काळात नव्याने तयार होणारी घरे, सदनिका, बंगल्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.
No comments
Post a Comment