Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - हत्येचा बदला हत्येनेच घेतला; हत्याकांडाने 'हा' तालुुका हादरला

No comments

    News24सह्याद्री -



 

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची निघृण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय! शेळके हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी शेळके हे एकटेच होते. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्यावर मारेकर्‍यांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्यांच्या मानेला खोल जखम झाली. त्यांना तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

राजाराम शेळके हे दहा वर्षापूर्वी नारायाणगव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी होते. त्यांच्यासह कांडेकर खून प्रकरणात आणखी काही आरोपी होते. राजाराम शेळके आणि त्यांच्या मुलाला या गुन्ह्यात शिक्षा लागली होती. कोरोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. पॅरोलची रजा उपभोगत असताना त्यांनी गावातील शेतात काम चालू केले होते आणि हे काम चालू असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्या वर  हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेळके यांचा खून म्हणजे बदला घेतल्याचाच प्रकार असल्याची चर्चा सध्या झडत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *