मोठी बातमी - रोहित पवार यांची केंद्र सरकारवर खरमरीत टीका
News24सह्याद्री -
रोहित पवार यांनी आज ट्विट करत गंगा नदी बद्दल चिंता व्यक्त केली आहे गंगेच्या पवित्र पाण्यात दुसऱ्यांची पाप धून काढण्याची क्षमता आहे अशी जनसामान्यांची भावना आहे मात्र चुकीच्या नियोजनामुळे पाप मुक्त करणारी पवित्र गंगा आता कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांची प्रेत टाकल्याने रोगाचा उगम स्थान बनते कि काय अशी भीती त्यांनी व्यक्त केलीये सरकारच्या उदासीनते मुले येणाऱ्या पिढ्यांना हि पवित्र गंगा नदी कुठल्या स्वरूपात दिसेल हे हि सांगता येणार नाही अशी टीका रोहित पवारांनी केलीये केंद्र सरकार्ने गंगेला राजकारणापलीकडे पाहून तिचे पावित्र्य कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्याचं गरजेचं असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. या ट्विट च्या माध्यमातून रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केल्याचं दिसतंय.
No comments
Post a Comment