जिल्ह्याची खबरबात - आ.रोहित पवारांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
News24सह्याद्री - आ.रोहित पवारांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
TOP HEADLINES
1. आ.रोहित पवारांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे आमदार रोहित दादा पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सानप,डॉ. वटाणे, डॉ. भिसे मँडम,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोबाईल क्लिनिक व्हँन ,फिरता दवाखाना मोफत औषधे सर्व आजाराकरीता प्रथमोउपचार शिबीर घेण्यात आले या शिबिरात सर्व आजारांवरच्या रुग्णांनाची तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यात आले.व औषधे मोफत देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी आमदार रोहित पवार व डॉक्टर यांचे आभार मानले.
No comments
Post a Comment