शहराची खबरबात - मनपाचा अजब कारभार खोदलेला रस्ता नगरसेवकांनी बुजवला
News24सह्याद्री - मनपाचा अजब कारभार खोदलेला रस्ता नगरसेवकांनी बुजवला... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. शिवसेनेच्या नगरसेवकांना बॅगा भरण्याच्या सूचना
महापौरपदा बाबतची गूढता दिवसेंदिवस वाढतच चालली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना खरच एकत्र येईल का? याबाबत या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना विश्वास नाही. शिवसेनेने मात्र आता पावले उचलण्यास सुरुवात केली, असून काही नगरसेवकांना बॅगा भरून ठेवण्याचे निरोप गेले असल्याचं सांगण्यात येतय. नगरच्या महापौर पदाची मुदत 30 जूनला संपत आहे. त्यापूर्वी नवीन महापौर पदाची निवडणूक होणार आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला आहे.
No comments
Post a Comment