Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - नगर शहरातील 'या' रोडला गुगलचे वादग्रस्त नामांतर

No comments

   News24सह्याद्री -




मनसेने अहमदनगर शहराच्या नामांतराचा मुद्दा घेतलेला असतानाच आता गुगलनेही त्यात उडी घेतली की काय असं दिसून येत आहे. औरंगाबाद आणि त्या पाठोपाठ अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा अधूनमधून गाजत असतो. त्यातच आता नव्या वादाची भर पडण्याची शक्यता आहे. गुगल मॅपने अहमदनगर शहरातील एका रस्त्याचे नाव बदलून औरंगजेब रोड असे दाखविले आहे.  शहरातील डीएसपी चौक ते बुऱ्हाणनगर रोड चौक या भिंगार कँटोन्मेंट हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याला पॉटींजर रोड असे नाव जुन्या काळापासून आहे मात्र या रोडला गुगलने औरंगजेब रोड हे नाव दिल आहे त्यामुळे नवीन वादाची ठिणगी पडली असून सोशल मीडियावर सध्या यायाबात जोरदार चर्चा सुरु आहे.

नगर शहराचा इतिहास पाहता औरंगजेबाने नगर शहरातील भुईकोट किल्ला ताब्यात  घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले तर दक्षिण भारताच्या मोहिमेवर असताना १६८३ मध्ये औरंगजेबाने भिंगार येथे आपल्या सैन्याची छावणी उभारली तर परातीच्या प्रवासा दरम्यान औरंजेबाचा १७०७ मध्ये मृत्यू झाला होता ते ठिकाण या रस्त्याच्या जवळच आहे मात्र तरीही कोणत्याही संघटनेने या रस्त्याला औरंगजेबाचे नाव दिल्याचं दिसून येत नाही  त्यामुळे या रस्त्याचे नाव परस्पर देऊन गुगलने नवीन वाद ओढावून घेतला आहे हा रोड लष्कर  हददीतून जात असल्यामुळे सुरक्षितचेया दृष्टीने महत्चायाचा आहे  गुगलने हा वाद का ओढवून घेतला असा प्रश्न आता उपस्थितीत होत आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *