Breaking News

1/breakingnews/recent

3 जून Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - महिलेचा खुन करुन मृतदेह कॉलनीत टाकुन मारेकरी फरार......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये




TOP HEADLINES

1. महिलेचा खुन करुन मृतदेह कॉलनीत टाकुन मारेकरी फरार
औरंगाबद वाळूज उद्योगनगरीच्या परिसरात काल  बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील एस.टी.कॉलनीत एका अनोळखी महिलेचा अर्धनगन्न व हात बांधलेल्या आवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या महिलेला मारहाण करुन तिचा खुन केल्यानंतर मारेकºयांनी तिचा मृतदेह या परिसरात टाकुन फरार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 

2. विद्यार्थ्यांसाठी  केडीएमसी कडून लसीकरण सुरू !
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील १८ ते ४४ वयोगटातील विध्यार्थी शिक्षण  घेण्यासाठी परदेशात  प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून आर्ट गॅलरी कल्याण येथे कोविशिल्ड लसीकरण २ व ३ जून रोजी देणार आहेत.कल्याण मधील आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर विद्यार्थ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून केंद्राबाहेर रांगा लावल्या असल्याचे विद्यार्थ्यांन कडून सांगण्यात आले आहे. जवळपास २००ते ३०० विद्यार्थ्यांनी यावेळी केंद्राबाहेर लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या.

 3. सीसॅट हा पेपर कधी पात्र करणार ?  
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मैदानी चाचणी पात्र करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्य सेवा परीक्षेसाठी पूर्व परीक्षेला असणारा सीसॅट हा पेपर कधी पात्र करणार ?, असा प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

 4. सध्या मानसिक आधार हाच कोरोनावर एकमेव उपाय : लंके   
सध्या मानसिक आधार हाच कोरोनावर एकमेव उपाय आहे.त्यांना कोरोना विरूध्द लढण्याचे आत्मबळ निर्माण करून देणे गरजेचे आहे. जागतिक महामारीच्या काळात महाराष्ट्रातील कोविड सेंटरला मदत करण्याची आवश्यकता आहे. यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. कारण आजच्या घडीला लोकांचे जीव वाचणे हेच महत्वाचे आहे असे मत पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.

5. ३ लाख २७ हजार २०० रुपयाचा माल जप्‍त
आर्वी पोलिसांनी पावर प्रकल्पातून चोरी गेलेल्या ४७ मोटारी आणि इतर दोन मोटरसायकल एक मेटाडोर असा ३ लाख २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई बुधवारी करण्यात आली

6. मिरज 'सिव्हिल'मध्ये ऑक्सिजन टँकला गळती
मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला बुधवारी रात्री अचानक गळती लागल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. सहा हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टँकला गळती लागल्यामुळे पोलिस, महापालिका अग्निशमन दलासह जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

7. आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय मगर यांचं निधन
हडपसर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय धोंडो मगर यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले.कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट द्वारे माहिती दिली आहे. त्यात सासरे श्री. सतीशमगर यांचे वडील आणि मगर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आबासाहेब उर्फ दत्तात्रय धोंडो मगर यांचं निधन झालं. हा क्षण आमच्या पवार आणि मगर कुटुंबासाठी अत्यंत दुःखद आणि कठीण आहे. 

8. बिद्रे हत्याकांडातील चारही आरोपीना न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार  
श्विनी बिद्रे हत्याकांडातील चारही आरोपीना न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे.या प्रकरणाची सुनावणी बुधवारी पनवेल सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजु पाटील,कुंदन भंडारी व महेश फणशीकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. आरोपींनी केलेले जामीन अर्ज न्यायमुर्ती माधुरी आनंद यांनी फेटाळले.

9. पुण्यातील खड्डे ८ दिवसांत नाहीसे होणार?
पुण्यातील सगळे रस्ते ८ दिवसांच्या आत पूर्ववत झाले पाहिजेत असे आदेश पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिलेे आहेत. पुण्यामध्ये झालेल्या रस्ते खोदाईच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहे.

10. पुण्यात २४ तास पाणीपुरवठा तसेच इतर कामांसाठी अनेक रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे.
डोंबिवली निवासी विभागातील रस्त्यांकरीता ११० कोटीचा निधी मंजूर डोंबिवली निवासी आणि औद्योगिक विभागातील रस्त्यांकरीता ११० कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याने या भागातील रस्ते विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *