सह्याद्री Breaking - टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
News24सह्याद्री -
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा धक्कादायक अनुभव आपण सर्वानीच घेतलाय. त्यामुळे त्यातून बोध घेऊन यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असले तरी आकड्यांचे अंदाज पहाता ती कमी पडू शकते. संसर्ग टाळण्यासाठी हिवरे बाजार पॅटर्न गावांसोबतच शहरांतही राबविण्यात यावा, अशा सूचना आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेसंबंधी राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर डॉ. भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्याची बैठक घेऊन या तिसऱ्या लाटेसंबंधी सूचना केल्या. गावात संसर्ग रोखणारा हिवरे बाजार पॅटर्न दुसऱ्या लाटेच्या वेळी पुढे आल्याने राज्याला योजना मिळाली. आता हाच पॅटर्न गावांसोबत शहरांतही राबवून संसर्गाला आळा घालणारे आणि रुग्ण संख्या मर्यादित ठेवणारे उपाय करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
No comments
Post a Comment