Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री Breaking - ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार

No comments

            News24सह्याद्री - 



आरक्षणासाठी मराठा समाजाने मूक मोर्चा काढल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. उद्या गुरुवारी समता परिषदेने ‘ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’चं आयोजन केलं आहे. समता परिषदेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्या गुरुवारी होणाऱ्या मोर्चाची माहिती दिली.

मार्च रोजी ओबीसी आरक्षणावर कोर्टाचा निकाल आला. तेव्हा कोरोना सुरू होता. तरीही आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण कोर्टाने ऐकलं नाही. कोर्टाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ५० ते ६० हजार जागांवर परिणाम होणार आहे. हा केवळ एका राज्याचा प्रश्न नसून देशव्यापी प्रश्न आहे, असा दावा त्यांनी केला. . त्यामुळे आम्ही उद्या आंदोलन करत आहोत. पण हे आंदोलन केंद्र किंवा राज्याच्या विरोधात नाही. आमचा आक्रोश आम्ही मांडणार आहोत, असं त्यांनी छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. 

मराठा समाजाने मूक मोर्चा काढल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार 
रुवारी समता परिषदेने ‘ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’चं आयोजन  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मोर्चाचं नेतृत्व करणार कोर्टाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ५० ते ६० हजार जागांवर परिणाम होणार हा केवळ एका राज्याचा प्रश्न नसून देशव्यापी प्रश्न आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *