गॉसिप कल्ला - युजरला सोनाली कुलकर्णीने चांगलेच पाडले तोंडावर
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ठरली सूर नवा ध्यास नवाची विजेती
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची' या रिएलिटी शोचा अंतिम सोहळा 13 जूनला रविवारी पार पडलाय. यात विजेता कोण ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे या पर्वाची विजेती ठरली.महाराष्ट्राच्याच नाही तर भारतभरातून सूर नवा ध्यास नवा स्पर्धेत उतरलेल्या गायिकांमधून १६ सुरेल गायिका सूर नवा ध्यास नवाच्या देदीप्यमान अशा महामंचावर दाखल झाल्या.या १६ सुरेल गायिकांमधून सहाजणींनी महाअंतिम फेरीत मानाचं स्थान मिळवलं. अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदेने परीक्षकांसोबतच लोकांचे मन जिंकत विजेतेपद मिळवले.
No comments
Post a Comment