मोठी बातमी - या खासदाराने महिला पोलिसा सोबत केले असे कृत्य तुम्हालाही पाहून चीड येईल
News24सह्याद्री -
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोबाईल पाडण्यासाठी महिला पोलिसांच्या हातावर फटका मारल्याचा आरोप करण्यात आलाय. खासदार जलील हे आज कामगार आयुक्त कार्यालयात गेले होते, काही व्यापाऱ्यांनी लॉक डाऊन असताना दुकाने उघडले होते, त्या मुळे त्यांच्यावर कामगार आयुक्त कार्यालयाने कारवाई केली,याबाबत विचारणा करण्यासाठी खासदार जलील यांनी दुकानदारांसोबत थेट कामगार आयक्त कार्यालय गाठले आणि अधिकारयांना या कारवाई बाबत जाब विचारला . यावेळी .तिथे मोठी गर्दी झाल्याने त्या ठिकाणी बंदोबस्तात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने जमावाचे चित्रीकरण करण्यास सुरवात केली असताना खासदार जलील यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याची घटना समोर आली आहे, सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीसा बरोबर गैरवर्तन केल्याचा स्वतंत्र गुन्हा हि क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.
No comments
Post a Comment