Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - आता आले कोरोना विषाणूला मारण्याचे यंत्र

No comments

    News24सह्याद्री -





कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत.त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत एक अनोखा उपक्रम राबविला आहे.या संस्थेमार्फत युरेका फोरब्ज या नामांकित कंपनीकडून कोरोनाचा विषाणू निष्क्रिय करणारे कोरोना गार्ड हे विकसित करण्यात आलेले यंत्र शासकीय कार्यालयांना भेट देऊन कार्यान्वित करण्यात आले आहेत. रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत संस्थेच्या नर्सिंग,फार्मसी व होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलासह तहसील कार्यालय जामखेड, पोलिस स्टेशन जामखेड व ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे युरेका फोरब्ज या नामांकित कंपनीचे कोरोना गार्ड यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार श्री. विशाल नाईकवाडे संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सचिव डॉ.वर्षां मोरे पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल बोराडे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ.शशांक शिंदे,सलिम बागवान,शरद ढवळे,विशाल गर्जे,राहुल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.
    
यापूर्वी कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात देखील स्थानिक प्रशासनाने संस्थेच्या शैक्षणिक संकुलात संस्थेच्या सहकार्याने कोवीड केअर सेंटर सुरू केले होते. यावेळीही   जामखेड व कर्जत तालुक्यातील लोकांसाठी संस्थेमार्फत कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सचिव डॉ.वर्षां मोरे पाटील यांनी दिली आहे.

 चौकट 1:-
कोरोना आपत्ती व्यवस्थापनासाठी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत विविध कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत असून या संस्थेचे प्रशासनास वेळोवेळी सहकार्य लाभत आहे.
 प्रांताधिकारी सौ.अर्चना नष्टे मॅडम

चौकट 2:-
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे हे प्रशासनास
नेहमीच मदत करत असतात.
 तहसीलदार श्री. विशाल नाईकवाडे

फोटो कॅप्शन:-*  रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत संस्थेच्या नर्सिंग,फार्मसी व होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलासह तहसील कार्यालय जामखेड, पोलिस स्टेशन जामखेड व ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे युरेका फोरब्ज या नामांकित कंपनीचे कोरोना गार्ड यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे,तहसीलदार श्री. विशाल नाईकवाडे संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व इतर मान्यवर.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *