शहराची खबरबात - शाळेने पालकांकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये
News24सह्याद्री - शाळेने पालकांकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. शाळेने पालकांकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये
सरकारने सध्या लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत त्यामुळे शहरातील काही खाजगी शाळांमधून पालकांना शाळा शुल्क भरण्यासाठी फोन केले जात आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्याबाबतचे मेसेज केले जात असल्याने पालकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच सरकारने अद्यापही शाळा आणि कॉलेज उघडन्या बाबत परवानगी दिली नसल्याने शाळेमधून शाळेचे शुल्क भरण्याबाबत मेसेज येत आसल्यामुळे काय करावे असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे तर कोणत्याही शाळेने पालकांकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये अशी सूचना आणि सक्त ताकीद शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती समोर येत आहे मात्र तरीही शाळा प्रशासन पालकांना मेसेज करून आणि फोन करून सशुल्क देणेबाबत मागणी करत आहेत.
No comments
Post a Comment