Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - महानगरपालिकेच्या वतीने घरपोहोच मृत्युचे दाखले

No comments

   News24सह्याद्री - महानगरपालिकेच्या वतीने घरपोहोच मृत्युचे दाखले..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. महानगरपालिकेच्या वतीने घरपोहोच मृत्युचे दाखले  
अहमदनगरला कोविडने मृत्यु पावलेल्यांचे मृत्युचे दाखले त्यांच्या नातेवाईकांना अहमदनगर महानगरपालिकेच्या वतिने आता घरपोहोच तसेच विनामुल्य देण्यात येणार आहे त्यामुळे नातेवाईकांनी अहमदनगर महानगरपालिका येथे मृत्यु दाखला मिळविण्यासाठी गर्दी करु नये असं आवाहन नागरिकांना महापालिकेच्या वतीने करण्यात आलय. 

2. लेखापरीक्षकांकडून पाच हजार 249 रुपयांच्या बिलांची तपासणी  
शहरातील लहान-मोठ्या बावीस कोविड रुग्णालयांनी कोरोना रुग्णांच्या बिलात अतिरिक्त नऊ लाख 36 हजार रुपये आकारले होते महापालिकेने केलेल्या लेखापरीक्षणात ही बाब समोर आली आहे . कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासाठी रुग्णांना दिलेले बिल तपासले जाते, त्यासाठी महापालिकेने 48 लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे.

3. अडीच वर्षानंतर शहर बँकेतील अपहार प्रकरणी दोषारोपपत्र दाखल  
शहर सहकारी बँकेतील 17 कोटी 25 लाख रुपयांच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणी दाखल तिन्ही गुन्ह्यात तब्बल अडीच वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेत शहरातील मुख्य सूत्रधार डॉक्टर निलेश विश्वास शेळके यांच्या विरोधात प्रथम दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 

4. केडगावला लसीकरण न झाल्यास शिवसेना रस्त्यावर 
रांगेत असणाऱ्यांनाच लस मिळत नाही काहींना दहा दहा चकरा मारून लस मिळत नाही लसींचा तुटवडा आहे तर उपकेंद्रांची बुळबूळ कशासाठी असा सवाल करीत केडगावला लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी दिला.

5. सात ते अकरा बिडी कारखाने सुरू करण्याची मागणी  
कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये  विडी  कारखाने बंद करण्यात आल्याने विडी कामगारांचा रोजगार बुडवून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे रुग्णांची संख्या घटल्याने कोरोनाचे नियम पाळून सकाळी सात ते अकरा पर्यंत विडी  कारखाने सुरू करण्यास परवानगी द्यावी तसेच बिडी कामगारांना दोन हजार रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी लाल बावटा कामगार युनियन च्या वतीने श्रमिक नगर येथे निदर्शने करण्यात आली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *