Special report - आमदार रोहित पवार थिरकले झिंगाट गाण्यावर
News24सह्याद्री - आमदार रोहित पवार थिरकले झिंगाट गाण्यावर.......पहा सह्याद्री special रिपोर्ट
पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे कोविड सेंटर मध्ये रुग्णांच मानसिक आरोग्य आणि मनोबल वाढवण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित करत आलेत तसेच कर्जत-जामखेडचे आ.राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हीड केअर सेंटरला आ. रोहित पवार यांनी काल भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. रोहित पवार हे रुग्णांच्या चेह-यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर थिरकले. हे पाहून रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन आला. उपचारांबरोबरच रुग्णांना मानसिक मनोबल आणि याताना दूर करण्यासाठी संगीत हे उत्तम पर्याय असून सतत एकाच गोष्टीकडे लक्ष गेल्याने माणूस तणावग्रस्त बनतो त्यामुळे संगीत हे एक उत्तम मेजवानी असल्याने अनेक ठिकाणी आता या थेरपीचा उपयोग केला जात आहे सेंटर मध्ये वातावरण बदलून एक वेगळं आनंदमय उत्साही वातावरण झाल्यामुळे रुग्णांनाही थोडासा दिलासा मिळत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे आमदार रोहित पवार यांनीही रुग्ण समवेत या गाण्यावर थिरकण्याचा आनंद घेतलाय.
No comments
Post a Comment