मोठी बातमी - नगर तालुक्यातील हनीट्रॅपमधील आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी
News24सह्याद्री -
नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनी ट्रॅप मधील आरोपी सचिन खेसे व बापू सोनवणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे तरी या गुन्ह्यातील आरोपी तरुणी व एजंट अमोल मोरे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. दरम्यान तरुणी व मोरे यांना न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात येईल अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली,हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या नगर तालुक्यातील बागादारांनी फिर्याद दिल्यानंतर संबंधित तरुणी आणि एजंट मोरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर याच गुन्ह्यात सहभाग असलेला बापू सोनवणे ला पोलिसांनी अटक केली होती या सर्वांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते न्यायालयाने तरुणी व मोरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सोनवणे ला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे आणि हनीट्रॅपमध्ये गुंतलेला क्लास वन अधिकारी यांनी फिर्याद दिल्यानंतर यामध्ये संबंधित तरुणी सह एजंट मोरे सचिन खेसे महेश बागले सागर खरमाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी खरमाळे व बागले अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
No comments
Post a Comment