सह्याद्री Breaking - नामदार जयंत पाटील यांची आ. निलेश लंकेच्या कोवीड सेंटरला भेट
News24सह्याद्री -
राज्यात आणि देशात अण्णा हजारे नंतर आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्याचे नाव महाराष्ट्रात कमविले असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. नामदार जयंत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्या भाळवणी मधील कोविड सेंटरला भेट दिली, त्यावेळी त्यांनी हे गौरवउदगार काढलेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यावर पक्षाच्या वतीने शाबासकीची थाप टाकण्यात आलीय. प्रसंगी निलेश लंके यांचे कोविद सेंटर महाराष्ट्रात एकमेव आदर्श कोव्हिड सेंटर असुन आम्हांला गौरव असल्याचे ना. जयंत पाटील म्हणालेत. गेल्या अनेक दिवसांपासून या कोव्हिड सेंटर बद्दल ऐकत होतो परंतु आज प्रत्यक्ष पाहिल्यावर निलेश लंके यांचा अभिमान वाटला. इथे हजारो रुग्णांना मोफत उपचार दिले जात असून या महामारीत आधार देण्याचे काम केल जात आहे, कोरोनाच्या या काळात एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील लोक दूर जात आहे.परंतु आमदार निलेश लंके यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे.दुख व वेदना विसरण्यासाठी व माणूसकी जपण्यासाठी आणि पवार साहेबांचा सच्चा माणूस आमदार निलेश लंके यांच्या रूपाने समाजामध्ये काम करत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांच्या या कार्याचा मी गौरव करतो असंही ते बोलताना म्हणालेत.यावेळी जयंत पाटील यांच्या वतीने २५ लाख रुपयांची औषधे या कोव्हिड सेंटरसाठी भेट म्हणून देण्यात आलीत.
No comments
Post a Comment