Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर

No comments

 News24सह्याद्री श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES

१.  तौक्ते चक्रीवादळाचा फटका भाईजानला देखील    
तौक्ते चक्रीवादळाचा केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजराजमध्ये जोरदार तडाखा बसला. इतकंच नाही तर या चक्रीवादळाचा मोठा फटका सलमान खानला देखील बसला आहे. त्याचा आगामी सिनेमा टायगर ३ लवकरच रिलीज होणार होता. मात्र तौक्ते चक्रीवादळामुळे त्याच्या चित्रपटाचा संपूर्ण सेटच उडून गेला. 

२. श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर
महाराष्ट्राला खळखळून हसवणा-या  श्रेया बुगडे या मराठमोळ्या कॉमेडी क्वीनवर नुकताच दु:खाचा डोंगर कोसळला. पण स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून ती प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली. 'चला हवा येऊ द्या'च्या  सेटवर सगळं काही विसरून हजर झाली. अर्थात एका क्षणी तिच्या अश्रूंचा बांध फुटलाच.नुकतेच कोरोनामुळे श्रेयाच्या दोन लाडक्या मावशींचे निधन झाले. 

३. 'द फॅमिली मॅन 2'चा ट्रेलर पाहून संतापले युजर्स  
दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवर 'द फॅमिली मॅन 2' ची कथा रचली गेली आहे आणि तूर्तास दक्षिण भारतातील लोक 'द फॅमिली मॅन 2'चा ट्रेलर पाहून संतापले आहेत. सीरिजमध्ये श्रीलंकेत आपल्या हिताची लढाई लढणा-या तामिळ बंडखोरांचा संबंध 'आय-एस-आय-एस' या अतिरेकी संघटनेशी जोडला गेल्याचा दावा अनेक लोकांनी केला असून सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. 'द फॅमिली मॅन 2' तामिळविरोधी आहे, तामळींना अतिरेक्यांसारखे दाखवण्यात आले आहे.

४. 'हिरड्या दाखवून हसण्याची मला लाज वाटत नाही - तेजस्विनी पंडित  
आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते.सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते.नुकताच शेअर केलेल्या तेजस्विनीच्या या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतोय. या फोटोत दिलखुलास हसताना तेजस्विनी दिसते आहे.तेजस्विनी म्हणते "perfect smile" वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत...मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. 

५. कोरोना परिस्थितीत उर्वशी रौतेलाही मदतीसाठी उतरली मैदानात

एरव्ही महागड्या फॅशनसाठी जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे सोशल मीडियावर चाहते भरभरुन कौतुक करत आहेत. त्याला कारणही तसे खासच आहे. कारण कोरोना परिस्थितीत घरात न बसता मदतीसाठी आता ती थेट मैदानात उतरली आहे. उर्वशीने देखील समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली आहे. या फाऊंडेशनच्या मदतीने स्वत: रस्त्यावर उतरून आता मदत करत आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *