शहराची खबरबात - तीन महिन्यांमध्ये पोलिसांनी केला चार कोटी रुपयांचा दंड वसूल
News24सह्याद्री - तीन महिन्यांमध्ये पोलिसांनी केला चार कोटी रुपयांचा दंड वसूल... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. तीन महिन्यांमध्ये पोलिसांनी केला चार कोटी रुपयांचा दंड वसूल.
गेल्या तीन महिन्यांमध्ये जिल्हा पोलीस दलाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम हाती घेतले असून, जिल्ह्यामध्ये 1 लाख 48 हजार 860 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत चार कोटी 34 लाख सहाशे रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
२. लसीकरणात सावळा गोंधळ
महापालिकेमार्फत होत असलेला लसीकरणा मध्ये भेदभाव केला जात असून राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांच्या सांगण्यावरूनच लसीकरण केले जात आहे ,मनपाच्या आरोग्य विभागात लसीकरणाचा सावळागोंधळ सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी करून याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवकांनी आयुक्तांना घेराव घातला यावेळी शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर शहर प्रमुख दिलीप सातपुते नगरसेवक बाळासाहेब बोराटे उमेश गवडे विक्रम राठोड आदी उपस्थित होते
३. आडते बाजार मर्चंट असोसीएशनतर्फे जिल्ह्यातील पोलीस बांधवांसाठी मास्क व सॅनीटायझरचेे वाटप
सध्याच्या काळत कोरोना विषाणूच्या विरोधात सर्व पातळीवर प्रयत्न सुरु असून नागरिकांच्या सुर्क्षिततते साठी सतत कार्यरत शहर व जिल्ह्यातील पोलीस बांधवांचे आरोग्य जोपासले पाहिजे , हि आपली सामाजिक जबाबदारी मानून या सर्वांना आडते बाजार मर्चंट असो.अहमदनगर तर्फे मास्क व सॅनीटायझरचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील यांच्या हस्ते मोफत वाटप मोहीम सुरु करण्यात आली.
4. ऑक्सिजन हा कोविड परिस्थितीत मानवी जीवनाचा महत्त्वाचा घटक-आ. अरुणकाका जगताप
कोरोना संसर्ग विषाणूंमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नागरिक मोठया संख्येने कोरोनाच्या आजाराने बाधित झाले होते.काही रुग्ण अतिसंवेदनशील झाल्यामुळे या रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत होती.
5. विकास कामाबरोबर शहराच्या सौंदर्यकरणात भर घालणार : आ. संग्राम जगताप
विकास कामाबरोबर शहराच्या सौदर्यकरणात भर घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. विकास कामाचा अनुक्रम ठरवून विकासकामे केल्यास पुन्हा पुन्हा ती कामे करावी लागत नाही. यासाठी जमिनी अंतर्गत सर्व कामे करणे गरजेचे आहे. शहरात फेज 2 पाणी योजनेचे काम पूर्णत्वाकडे आले आहे याच बरोबर भुयारी गटर योजनेचे कामही सुरू आहे. यानंतर रस्त्याची कामे हाती घेतली आहे.
No comments
Post a Comment