शहराची खबरबात - काल नगरमध्ये एकही रेमडेसिवीर नाही!
News24सह्याद्री - काल नगरमध्ये एकही रेमडेसिवीर नाही!... पहा शहराची खबरबात मध्ये
1. सिद्धिविनायक कॉलनी मध्ये कंटेनमेंट झोन जाहीर
सावेडी उपनगरातील रेणाविकर शाळेसमोरील सिद्धिविनायक कॉलनीत महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी कंटेनमेंटझोन जाहीर केला आहे सिद्धिविनायक कॉलनी व लगतच्या परिसरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहता महापालिकेने हा निर्णय घेतला महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी या भागाची पाहणी केली.
2. नावश्यक वस्तू पुरवण्यात येणार आहेत
हमीदपुरला सव्वा लाखांची घरफोडी
शहरातील हमीदपूर येथे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 14 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झालेत.घरमालक एकनाथ कोंडिबा कांदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास सुरू आहे
3. काल नगर मध्ये एकही रेमेडिसिवीर नाही
सध्या रेमेडिसिवीर चा साठा उपलब्ध झाल्यानंतर 50 टक्के नगर शहर व 50 ग्रामीण भागात वितरण केले जात आहे शहर व ग्रामीण मिळून सुमारे साडेपाच हजारांच्या बेडची संख्या गृहित धरून हे वाटप केले जात आहे व ऑक्सिजन बेड संख्या सोबत उपलब्ध साठा चा भागाकार करून त्याच प्रमाणात वितरण केले जाते,परंतु सध्या जिल्ह्यात मागणीच्या दहा टक्केही साठा मिळत नसल्याने गोंधळ सुरू आहे.
4. झडतीत सापडलेल्या मोबाईलची चौकशी सुरु
पारनेर येथील दुय्यम कारागृह मध्ये पोलिसांनी घेतलेल्या अंगझडती दरम्यान आरोपी कडे दोन मोबाईल सापडले हे मोबाईल त्यांना जेवण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या चौकशीत समोर आले त्यानुसार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या दरम्यान याच बराकीमध्ये रेखा जर यांच्या हत्याकांडात पोलिसांनी घोषित केलेल्या मुख्य सूत्रधार बाळ कोठे हाही होता.
5. लॉकडाउन काळात निर्बंधाचे कडक अंमलबजावणी करा-शंभूराज देसाई
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखणे सर्वात महत्त्वाचे आहे त्यामुळेच लॉकडाऊन मध्ये लावण्यात आलेल्या संचारबंदी मध्ये कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृह वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता पवन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
No comments
Post a Comment