Breaking News

1/breakingnews/recent

३ मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - `सीए' परीक्षेसाठी ६ मेपर्यंत अर्जाची संधी....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES


1. दिल्लीसह आणखी चार राज्यात निर्बंध लागू
राष्ट्रीय राजधानीत कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होत असल्याने सोमवारनंतर आणखी आठवडाभर म्हणजे ११ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ट्विटरवरून केली. महाराष्ट्र, कर्नाटकपाठोपाठ हरियाना, ओदीशासह मिझोराममध्येही निर्बंध लागू करण्यात आले.

2. सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला अल्टीमेटम
ऑक्सिजन तुटवड्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अल्टीमेटम दिलाय. 3 मेच्या मध्यरात्री किंवा त्यापूर्वी दिल्लीचा ऑक्सिजन पुरवठा दुरुस्त करावा, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. केंद्र सरकारने राज्यांशी सल्लामसलत करून ऑक्सिजन पुरवठा करण्याची यंत्रणा तयार केली पाहिजे. 

3. `सीए' परीक्षेसाठी 6 मेपर्यंत अर्जाची संधी
सीए परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाने  सीए परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे. विद्यार्थी आता 6 मेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

4. राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता
राज्यातील काही भागांमध्ये आगामी दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांवर रक्षणासाठी ताडपत्री अथवा प्लॅस्टिकचं आवरण टाकावे, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

5. अमेरिकेकडून वैद्यकीय मदत
देशात कोरोना व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज भारतात तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *