मोठी बातमी - ५वी नापास आमदारासारखं मी रुग्णांना इंजेक्शन दिलं नाही
News24सह्याद्री -
रोहित पवार हे रुग्णांच्या चेहऱ्यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर थिरकले यावर प्रवीण दरेकर यांनी सवाल विचारला आहे की पीपीई न घालता रोहित पवारांनी डान्स केला शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून रोहित यांना दुसरा न्याय का ? त्यावर आता रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत ''सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब सेंटर मधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे त्यामुळे शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो, अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतोय त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच मी त्यांना भेटतो.'' अस त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात कोविडमुळे खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळे धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय ? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे. असं रोहित पवार यांनी म्हटलंय तसेच ''आणि हो पाचवी नापास झालेल्या गुजरात मधल्या एका आमदारसारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही तसंच आपलेही पक्षाचे अनेक नेते पीपीइ किट शिवाय रुग्णांना भेटले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचे ही काही दिसलं नाही असं का ? असं ट्विट करत रोहित पवार यांनी दरेकरांवर टोला लगावलाय.
No comments
Post a Comment