Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - रामवाडी झोपडपट्टीतील अतिक्रमणे काढण्यास महापालिकेची सुरुवात

No comments

 News24सह्याद्री - रामवाडी झोपडपट्टीतील अतिक्रमणे काढण्यास महापालिकेची सुरुवात..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. नगर शहरात प्रथमच अत्याधुनिक सौर पथदिव्यांची उभारणी
 नगर शहराचा विकास करताना शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच काळाबरोबर चालून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त विकासावर भर देत. विजेची बचत होण्यासाठी शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सौर उर्जेवर चालणारे पथदिवे लावण्यात येत आहे. नगर शहरात प्रथमच अत्याधुनिक सौर पथदिव्यांची उभारणी केली गेले आहे.

२. रामवाडी झोपडपट्टीतील अतिक्रमणे काढण्यास महापालिकेची सुरुवात
रामवाडी झोपडपट्टीतील अतिक्रमणे काढण्यास महापालिकेने गुरुवारी सुरुवात केले वारंवार सांगूनही अतिक्रमणे काढली जात नसल्याने महापालिकेचे पथक तेथे गेल्यानंतर त्या लोकांनी एक दिवसाची मुदत मागितली मात्र महापालिकेच्या पथकाने समोर उभे राहूनच त्यांना साहित्य हलविण्यास सांगितले.

३. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक
महापौरपदासाठी राजकीय हालचालींना आता वेग आला असून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची बैठक झाल्याचे समजते विशेष म्हणजे शिवसेनेतील काहींना या बैठकीपासून अंधारात ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत 30 जूनला संपत आहे त्यापूर्वी महापौरपदाची निवडणूक घेण्याच्या हालचाली आहे महापालिकेने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला आहे.

४. लसीकरण केंद्रावर नागरिकांची धांदल
सरकार कडून कमी प्रमाणात होणारा पुरवठा आणि विविध लसीकरण केंद्रावर हस्तक्षेपास सह इतर कारणांनी उडणारा गोंधळ यातून कशीबशी लस मिळाली तरी त्याचे समाधान आणि त्यांना लाभ होईलच असे नाही लस घेतली असतानाही ना त्याचा मेसेज आला ना त्याचे प्रमाणपत्र मिळाले अशी अवस्था असलेल्यांची संख्या मोठी आहे 

५. आरोपीकडून 35,834 रुपयांचा मुद्देमाल  जप्त
अवैध गावठी हातभटटी आणि देशी दारु व ताडी तसेच मुद्देमालसह आरोपीला अटक करण्यात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या पथकाला यश आलाय या कारवाईत जय विठ्ठल भिंगारदिवे यास अटक करण्यात आलीय शिशिरकुमार देशमुख यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ही करवाई करण्यात आलीय आरोपीकडून 35834 रुपयांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आलाय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *