Breaking News

1/breakingnews/recent

३ मे सह्याद्री सुपरफास्ट

No comments

News24सह्याद्री - कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्याने ट्रेन समोर उडी घेऊन संपवलं आयुष्य...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES


१. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा तडफडून मृत्यू
कर्नाटकातील चमराजनगर जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा मृत्यू झालाय. यामुले काँग्रेसनं संताप व्यक्त केला असून, स्वतःची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी केंद्र सरकार लोकांच्या जीवाशी खेळ करत आहे, असा आरोप केला आहे.

२. अमेरिकेचे नवीन पाऊल, 4 मेपासून प्रवासावर बंदी
अमेरिकेने आता भारतातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांचे कारण म्हणून  भारतातून प्रवास करण्यावर बंदी आणण्याची घोषणा केलीये . मंगळवार, 4 मेपासून हे निर्बंध लागू होतील. व्हाईट हाउसने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. तथापि, काही अहवालानुसार या निर्बंधांचा अमेरिकन नागरिक आणि ग्रीन कार्ड धारकांवर परिणाम होणार नाही. 

३. SBI कडून ७१ कोटींची मदत
देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. तर, मृत्यू संख्येत मोठी भर पडत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे.करोनाविरोधातील या लढाईत भारताल मदत करण्यासाठी जगभरातील अनेक देश पुढे आले आहेत. 

४.'ऑक्सिजन ब्रिगेड' मार्फत मोफत ऑक्सिजन सिलेंडरचं वाटप
 चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्थानिक युवकांच्या पुढाकाराने स्थापन झालेली 'ऑक्सिजन ब्रिगेड' कोरोनाच्या संकट काळात अनेकांचे जीव वाचवण्यात उपयोगी ठरत आहे. वरोरा शहरातील गांधी उद्यान योग मंडळाच्या 12 कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात एकत्र येत ही 'ऑक्सिजन ब्रिगेड' तयार केली आहे. 

५. टास्क फोर्सने केंद्र सरकारला दिला सल्ला
देशाला सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून रुग्णसंख्येने गाठलेले उच्चांक केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने करोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान केंद्र सरकारसमोर आहे. या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का ? अशी चर्चादेखील रंगली आहे. 

६. मोफत लसीकरणाची विरोधकांची मागणी
 करोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील १३ विरोधी पक्षांनी मोफत लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेले ३५,००० कोटी रुपये या लसीकरणासाठी खर्च करावेत, असे विरोधकांनी म्हटले आहे.  देशातील सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना अखंडित प्राणवायू पुरवठा करण्याची मागणीही विरोधकांनी संयुक्त निवेदनाद्वारे केंद्राकडे केली आहे.

७. बंगालमध्ये निकाल लागताच हिंसाचार
प्रचारादरम्यान हिंसाचाराचं गालबोट लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल लागताच हिंसाचाराचा उद्रेक होताना दिसत आहे. निकाला लागल्यापासून राज्यातील विविध ठिकाणी हिंसक घटना घडल्या असून, यात आतापर्यंत ४ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. नंदीग्राममध्येही हिंसक घटना घडली असून, नंदीग्राम भाजपाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. 

८. करोना पॉझिटिव्ह दाम्पत्याने ट्रेन समोर उडी घेऊन संपवलं आयुष्य
करोनाने देशभरामध्ये हाहाकार माजवला आहे. मागील वर्षी विद्यार्थी अडकून पडलेल्या देशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे करोना पॉझिटिव्ह आलेल्या एका वृद्ध दांपत्याने ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . 

९. सुप्रीम कोर्टाचे केंद्र आणि राज्यांना निर्देश
देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला लॉकडाऊनबाबत विचार करण्यास सांगितलं आहे. लॉकडाऊन लावण्याआधी सरकारने हे निश्चित करावं की , याचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी होईल. 

१०. चेन्नईच्या टीममध्येही केला शिरकाव
भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामावर सध्या करोनाचे सावट गडद होत चालले आहे. कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) संघातही करोनाने ‘एन्ट्री’ घेतली आहे. चेन्नईच्या तीन सदस्यांना देखील आता करोनाची लागण झाली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *