Breaking News

1/breakingnews/recent

6 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल- डिझेलचे दर वाढले...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. महाराष्ट्र मॉडेलचा वापर करा
सुप्रीम कोर्टाने ऑक्सिजनच्या नियोजनासंदर्भात मुंबई पालिकेचं कौतुक केलं आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाही मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला नसल्याच्या मुंबई पालिकेच्या प्रयत्नांचे सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं आहे. पालिकेने व्यवस्थापन कसे केले, याचे पालिका अधिकाऱ्यांकडून धडे घेण्याची सुप्रीम कोर्टाने केंद्र तसंच दिल्ली सरकारला केली. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात महाराष्ट्र पॅटर्न राबवण्याची गरज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलून दाखवली.

2. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल- डिझेलचे दर वाढले
विधानसभा निवडणुका संपल्यापासून सुरु झालेली इंधन दरवाढ सलग तिसऱ्या दिवशीही पाहायला मिळाली. देशाच्या राजधानीमध्ये म्हणजेच दिल्लीत पेट्रोलचे दर 25 पैशांनी तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढले. ज्यानंतर दिल्ली पेट्रोलची किंमत 90.99 आणि डिझेलची किंमत 81.42 रुपयांवर पोहोचली.

3. राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण
कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या सर्वच विभागांत आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर काही भागांत दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहील, असा अंदाज आहे

4. लस दीडशे रांगेत लोक पाचशे
औरंगाबादमध्ये लसीकरणासाठी तोबा गर्दी झाली आहे. सिडको, एन आठ इथल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी उसळली आहे. आजच्या दिवशी केवळ दीडशे नागरिकांनाच लस देण्याचे नियोजन असताना पाचशेहून अधिक लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

5. सोसायटीमध्येच राबवता येणार कोरोना लसीकरण मोहिम
लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेनं मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेसाठी मुंबईकरांना काही अडचणींचा सामना करावा लागत होता. लसीकरण केंद्रावरील गर्दी, लसींच्या तुटवड्याअभावी लांबलेल्या लसीकरणाच्या तारखा अशा अडचणींवर तोडगा म्हणून पालिकेनं मुंबईकरांना एक चांगला पर्याय दिला आहे. 

6. सुशील कुमारवर मनुष्यवधाचा गुन्हा
  दिल्लीच्या छात्रसाल स्टेडियमवर मंगळवारी रात्री झालेल्या हाणामारीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, अनेक कुस्तीपटू जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांवर दिल्ली पोलिसांत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आहे.

7. तृतीय पंथीयांना महानगरपालिकेत देणार नौकरी
औरंगाबाद महानगरपालिकाआणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ने तृतीय पंथीयांच्या नियुक्ती बद्दल बुधवारी पहिली बैठक आयोजित केली  होती. यावेळी तृतीय पंथीयांचा स्मार्ट सिटीच्या कामात समावेश करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर ट्रान्सजेंडर्सच्या हक्कांच्या हितासाठी काम करणार्‍या व्यक्तींकडून हे ध्येय साध्य करण्यासाठी मदत घेतली आहे. 

8. महानंदचे दूध दोन रुपयांनी स्वस्त
देशासह राज्यात महागाईने उच्चांक गाठला आहे. मांसाहार महाग झाला आहे. भाजीपाला महाग झाला आहे. अशा महागाईच्या काळात महानंद डेअरीने एक लिटर दूधाचे भाव दोन रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. 

9. डॉक्टरांना चोर म्हणणं सुनील पालला पडलं भारी
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत चालला आहे. परिणामी रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, औषध, लसी यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. परंतु या प्रतिकूल परिस्थितीचा देशातील 90 टक्के डॉक्टर्स गैरफायदा घेत आहेत असा आरोप प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल  यानं केला होता. 

10. विराट कोहलीचा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन  स्थगित झाला आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होताच टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा कॅप्टन विराट कोहली  कोरोनाग्रस्तांच्या मदत कार्यात उतरला आहे. विराटनं यापूर्वी देखील Covid-19 महामारीच्या काळात खबरादारी घेण्याचं आवाहन केलं आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *