Breaking News

1/breakingnews/recent

देशात संपूर्ण लॉकडाउन?; टास्क फोर्सने केंद्र सरकारला दिला लॉकडाऊन सल्ला

No comments


मुंबई -

सध्या कोरोना संसर्ग जास्त प्रमाणात वाढल्या मुळे देशाला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून रुग्णसंख्येने गाठलेले उच्चांक केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्याच मोठे आव्हान केंद्र सरकारसमोर आहे. या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का ? अशी चर्चादेखील रंगली आहे. दरम्यान देशात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी द लॅन्सेट इंडिया टास्क फोर्सने केंद्र सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्या आहे. टास्क फोर्सने केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या आहे. यामध्ये लॉकडाउनचाही उल्लेख आहे. टास्क फोर्सने केंद्राला सूचनांचा स्विकार करताना लॉकडाउनच्या चर्चेच्या पुढे यावर विचार केला पाहिजे असे म्हटले आहे. टास्क फोर्सने केंद्राला दिलेल्या सूचनांनध्ये दैनंदिन रुग्णसंख्या, रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण, दैनंदिन चाचण्यांची संख्या, आयसीयी बेड्स वापरण्याचे प्रमाण यांचा उल्लेख आहे.

आर्थिक परिणाम लक्षात घेत सल्लामसलत करुन सर्व पावले उचलली पाहिजेत अशी शिफारस टास्क फोर्सने केली आहे. यावेळी त्यांनी सर्वाधिक फटका बसणाऱ्यांसाठी योग्य कार्यक्रम आणि सुरक्षा जाळं निर्माण होईल याची खात्री करण्याचाही सल्ला दिला आहे. टास्क फोर्सने संपूर्ण लॉकडाउनला विरोध केला आहे. संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव पर्याय नसून अनेक गोष्टी करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. योग्य ठिकाणी लक्ष्य देत आणि समनव्य साधत परिस्थितीला हाताळणं गरजेचं आहे असं सांगण्यात आले आहे. उचलण्यात येणारी पावलं स्थानिक स्थितीच्या आधारे वेगळी असू शकतात. ज्या ठिकाणी संसर्ग वेगाने पसरत आहे तिथे अनेक निर्बंध आणावे लागतील. तर जिथे संख्या कमी आहे तिथे कदाचित योग्य निर्बंध असतील असे टास्क फोर्सने म्हटले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *