शहराची खबरबात - नेप्ती उपबाजार समिती समोर नागरिकांनी उडवला सोशल डिस्टनिंगचा फज्जा
News24सह्याद्री - नेप्ती उपबाजार समिती समोर नागरिकांनी उडवला सोशल डिस्टनिंगचा फज्जा... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. राजश्री ताई मांढरे यांचे दुःखद निधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव तथा माजी शहर महिला जिल्हाध्यक्षा राजश्री ताई मांढरे यांचे आज दुःखद निधन झाले. सर्वत्र शोककळा पसरली असून , परिसरात हळहळ विकत होत आहे . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
2. बाजार समिती अनलॉकचे आदेश जारी
करोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती खुल्या करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी बाजार समिती अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार बाजार समिती मध्ये सकाळी ७ ते ११ यावेळेत भाजीपाला, फळं, शेतिमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू करता येतील. २५ मे मध्यरात्री 12 वाजल्यापासून सदर आदेश लागू होतील.
3. नेप्ती उपबाजार समिती समोर नागरिकांनी उडवला सोशल डिस्टनिंगचा फज्जा
नागरिकांना वेळोवेळी सांगूनही नागरिक नियम पाळत नसल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते त्यामुळेच कोरूना चा संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहेत आज सकाळच्या दरम्यान नेप्ती उपबाजार समिती समोर शेतकरी भाजी विक्रेत्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टनिंग फज्जा उडाला होता या ठिकाणी अनेक शेतकरी विविध गावातून येत असतात तसेच किरकोळ व्यापारी या ठिकाणी भाजी घेण्यासाठी गर्दी करत असल्याने हा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे
4. आजपासून दक्षता पथकाची कारवाई
महापालिकेने ज्या अस्थपणा सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहेत अशा आस्थापनातील मालकासह कामगारांना कोरणा चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे ही चाचणी करून घेण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली होती ही मुदत आज संपली आहे सुरु असलेल्या दुकानांची दक्षता पथकाने केलेल्या तपासणीत अहवाल आढळून न आल्यास दुकानदारावर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
5. नगर सचिवांकडून प्रस्ताव तयार निर्णयाकडे लक्ष
महापौर बाबासाहेब वाकळे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल येत्या 30 जून रोजी संपत आहे त्या महापालीकेत महापौर निवडीचे पडघम वाजू लागले आहेत . आगामी महापौर निवडणुकीचा प्रस्ताव नगर सचिव कार्यालय ने तयार केला असून तो आयुक्त शंकर गोरे यांना सादर करण्यात आला आहे आयुक्तांच्या मान्यतेनंतर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.
6. महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र करा : लता शेळके
शहर व परिसरातील महिलांना कोरोना वरील लस प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी तसेच महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे सोमवारी केले.
No comments
Post a Comment