Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - शहरातील बाजारपेठा सुरु करण्यासाठी आयुक्तांना निवेदन

No comments

 News24सह्याद्री - शहरातील बाजारपेठा सुरु करण्यासाठी आयुक्तांना निवेदन..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. धारदार शस्त्राने पोटात वार करून तरुणाची हत्या
किरकोळ कारणातून दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाची धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या करण्यात आली.शरद दत्तात्रय वाघ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. यामध्ये आणखी चौघे तरूण जखमी झाले आहेत.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
2. महिलेचे अश्लील फोटो प्रसारित केलेल्या आरोपीस अटक
नगरमधील एका महिलेने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे रोहित जालिंदर पाटोळे याच्याविरुद्ध तक्रार दिली यांचे प्रेम संबंध असून बाहेर फिरायला गेले असता रोहित पाटोळे याने  त्या मुलीचे काही अश्लील फोटो काढले त्यानंतर लग्नाच्या मागणीला नकार दिल्यामुळे सोशल मीडियावर फेक अकाउंट ओपन करून तिचे अश्लील फोटो त्याद्वारे प्रसारित केले.

3. पोलीस गस्तीचे वाहन होणार ऑक्सिजनयुक्त
नगर शहरामध्ये गरजूंच्या दोन वेळचे जेवण पुरवणाऱ्या घर घर लंगर  सेवेच्या वतीने रुग्णसेवा देखील सुरू असून कोरूना च्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गरजू रुग्णांना ऑक्सिजनचे कॅन चे  वाटप सुरू आहे लंगर सेवेच्या वतीने अहमदनगर पोलीस दलात 200 ऑक्सीजन कॅन देण्यात आले.

4. अहमदनगर स्थापना दिनी ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करावा-भगवान फुलसौंदर
 अहमदनगर शहराचा ५३१ वा स्थापना दिन येत्या २८ मे रोजी आहे. सध्या लोकडाऊन असल्याने या शहराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेने स्थापना दिनी अाॅनलाइन कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली. 

5. शहरातील बाजारपेठ सुरु करण्यात यावी असे आयुक्तांना निवेदन -
नगर शहरात मागील ६ एप्रिल पासून सर्व बाजारपेठा कोरूना मुळे बंद करण्यात आल्या  आहेत त्यामुळे सर्व व्यवहार देखील ठप्प झाले आहेत बाजारपेठेमुळे त्यावर अवलंबून असणारे हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आलीये. नगर शहरातील रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *