Breaking News

1/breakingnews/recent

सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतक ठोकू शकतो

No comments



मुंबई -

कोरोना मुळे सध्या IPLचे काही सामने पुढं ढकलण्यात आले आहे. ‘किंग कोहली’ या नावाने प्रसिद्ध असणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे सध्या जगातील अव्वल फलंदाज म्हणून पाहिले जाते. विराट कोहली वाऱ्याच्या वेगाने एक-एक रेकॉर्ड तोडत असून क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा तो केवळ 30 शतके मागे असून, अशाच वेगात शतके ठोकत राहिला तर निवृत्तीपूर्वी सचिनपेक्षा 30 शतक अधिक ठोकू शकतो, असे सध्याच्या सरासरीवरुन समोर आले आहे.  कोहली सद्यस्थितीला तेंडुलकरपेक्षा 207 एकदिवसीय सामने कमी खेळला असला तरी तो केवळ 6 शतकंच मागे आहे. विराटने 245 एकदिवसीय सामन्यांत 43 शतके केली आहेत. तर सचिनने संपूर्ण कारकिर्दीत 452 एकदिवसीय सामन्यांत 49 शतकं केली होती. त्यामुळे जर विराट सचिन इतके सामने खेळला आणि सद्याच्या सरासरीने शतकं करत राहिला, तर निवृत्तीपूर्वी तो 79 शतकं ठोकू शकतो, जी सचिनपेक्षा 30 ने अधिक असतील. 

विराट कोहली आतापर्यंत वन डे, टी ट्वेण्टी आणि कसोटी अशा सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 482 सामने खेळला आहे. जेव्हा सचिन 482 सामने खेळला होता, त्यावेळी त्याची आकडेवारी किती होती आणि कोहलीची किती आहे, त्याची तुलना केल्यास कोहली खूप पुढे असल्याचं दिसतं. वन डे, टी ट्वेण्टी आणि कसोटी अशा सर्व फॉरमॅटमधील आंतरराष्ट्रीय 482 सामन्यात, सचिनने 49.03 च्या सरासरीने 21 हजार 331 धावा करत 66 शतकं ठोकली होती. मात्र कोहलीने तितक्याच सामन्यांत, तिन्ही फॉरमॅटमध्ये 55.78 च्या सरासरीने 22 हजार 818 धावा करत 70 शतके ठोकली आहेत. म्हणजेच कोहलीची सरासरी ही सचिनपेक्षा खूप जास्त आहे. एका वर्षात सर्वाधिक शतके ठोकण्यात मात्र तेंडुलकरच पुढे असून 1998 मध्ये तेंडुलकरने 12 शतकं केली होती, तर कोहलीने 2017 आणि 2018 मध्ये प्रत्येकी 11 शतकं केली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांत शतक किंवा अर्धशतक ठोकण्याचा विराट कोहलीची सरासरी उत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंत 115 अर्धशतकं तर 70 शतकं केली आहेत. याचा अर्थ कोहली दर 2.64 सामन्यांनतर शतक किंवा अर्धशतक ठोकतो. या सरासरीने कोहली चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोहलीपेक्षा केवळ 0.4 च्या फरकाने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा नंबर लागतो. तर तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *